आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती वाटपात सुव्यवस्था येईपर्यंत पैसे हस्तांतरण थांबवा, उच्च न्यायालयाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर नागपूर खंडपीठाने मंगळवारी पुन्हा राज्य सरकारला फटकारले. शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या सदोष व्यवस्थेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याबाबत योग्य व्यवस्था अस्तित्वात येत नाही तोवर डीबीटी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येऊ नयेत, असे अादेशही न्यायालयाने सामाजिक न्याय विभागाला दिले. 


अलिकडेच शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यावर प्रश्नचिन्ह लावत अनेक शिक्षण संस्थांनी एका याचिकेच्या माध्यमातून नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. 

बातम्या आणखी आहेत...