आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’ची दिंडी अडवली; खासदार सुप्रिया सुळे ताब्यात; कार्यकर्ते अाक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राष्ट्रवादीने यवतमाळ येथून सुरू केलेली हल्लाबोल दिंडी सोमवारी नागपुरात दाखल झाली. ही पदयात्रा विमानतळाजवळ अडवण्यात आल्यावर खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख या नेत्यांनी तेथेच बसून आंदोलन सुरू केले.

 

पोलिसांनी सुळे आणि देशमुख यांना ताब्यात घेतले. या नेत्यांची लगेच सुटका करण्यात आली.   
या दिंडीचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख करीत होते. या दिंडीत जवळपास दीड हजारावर कार्यकर्ते होते. ही दिंडी पोलिसांनी विमानतळाजवळ अडवल्याने  आंदोलक रस्त्यावर बसले. सुप्रिया सुळे व अनिल देशमुख  यांनी  पोलिसांशी चर्चा केली. दिंडी शांततेने येत आहे. वाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना ताब्यात घेऊन पोलिस वाहनात बसवले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी ‘हल्लाबोल हल्लाबोल’ अशा घोषणा देत या अटकेचा निषेध केला. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्यांची हवा सोडली, तर काही कार्यकर्ते पोलिस वाहनाच्या टपावर चढले. कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर काही वेळाने पोलिसांनी खासदार सुळे व अनिल देशमुख यांची सुटका केली. दरम्यान, कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता दिंडी काढणाऱ्या  कार्यकर्त्यांना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्याचा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी निषेध  केला. 


राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्या यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असताना कोणतेही कारण न देता राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी अटक केली, असा आरोपही त्यांनी केला.

 

अाज हल्लाबाेल माेर्चा, वाढदिवशी शरद पवार उतरणार रस्त्यावर

नागपूर- राज्यातील शेतकरी आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी आणि बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांचा संयुक्त हल्लाबोल मोर्चा मंगळवारी विधान भवनावर धडकणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अापल्या वाढदिवशीच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार अाहेत. पवार व काँग्रेसचे राज्य सभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद या मोर्चाचे नेतृत्व करणार अाहेत.  

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... नागपुरातील हल्लाबोल आणि चक्काचाम आंदोलनाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...