आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयीन मोबाइल सीम कार्ड बंद; महावितरणचे 'असहकार', वीज ग्राहकांची गैरसोय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महावितरण व महापारेषणमध्ये कार्यरत असलेले सबऑर्डींनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या ('एसईए') राज्यातील हजारो अभियंत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २० डिसेंबरपासून शांततेच्या मार्गाने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. मात्र, तोडगा निघाला नसल्यामुळे याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून पाच जानेवारी २०१८ पासून 'एसईए'च्यासर्व अभियंत्यांनी कार्यालयीन मोबाइल सीम कार्ड कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात जमा करून असहकार आंदोलन सुरू केले आहे. मोबाइल सीम बंद असल्यामुळे ग्राहकांचा अधिकाऱ्यांसोबत संपर्कच बंद झाला आहे, पर्यायाने ग्राहकांची गैरसोय होत आहे.


या आदंोलनात जिल्हाभरातील जवळपास ३५० अभियंते सहभागी झाले आहेत. 'एसईए'ने अभियंत्याशी निगडीत विवीध मागण्या प्रशासनाकडे लावून धरल्या आहेत. यामध्ये अभियंत्याची कामाची जबाबदारी आणि तास निश्चित करण्यात यावेत, रिपोर्टींग व नियोजनाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, विजदेयकांची वसूली व चोरीची वीज कापण्यासाठी कारवाईला गेल्यानंतर अनेकदा अभियंत्याविरुद्ध खोट्या तक्रारी होतात, त्यामुळे खोट्या तक्रारींबाबत सरक्षण मिळण्यात यावेत, व्यवस्थापनाच्या गैरवर्तणुकीला आळा घालण्यात यावा, विभागीय मुख्य अधिकारी म्हणून अनुभवी व पात्र विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, वीज खरेदी करारनाम्यात सुधारणा करण्यात याव्यात, तिन्ही कंपन्यामध्ये कार्यरत महिला अभियंत्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जळगाव विभाग मुंबई विभागाला जोडण्यात याव्यात, डिसेंबर २०१७ च्या परिपत्रकात सुधारणा करण्यात याव्यात, कार्यरत असलेल्या कर्मचारी व अभियंत्यांना लोकसेवकाचा दर्जा मिळावा,आदी मागण्या करण्यात आल्या.

 

या पद्धतीने सुरू आहे आंदोलन
२० डिसेंबर २०१७ ला विभागीय, सर्कल, केन्द्र, उपकेन्द्रावर बैठकि घेण्यात आल्यात. २१ डिसेंबरला ऊर्जा मंत्रीसचिव यांना ईमेल व एसएमएसव्दारे निवेदन , २६ डिसेंबरला अतिरीक्त कार्यभाराचा सोडला, ४ जानेवारी २०१७ बैठकी घेवून लोकप्रतिनिधींना निवेदन, ५ जानेवारीला कार्यालयीन सीम कार्ड परत करण्यात आले. १० जानेवारीला व्दार बैठकी तसेच १६ व १७ जानेवारीला आत्मक्लेश आंदोलन करतील तसेच दोन दिवस घरी न जाता कार्यालयात किंवा कार्यालय परिसरात राहणार आहे.


मुद्दा निकाली निघेस्तोवर आंदोलन सुरूच : आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत. त्या निकाली निघेपर्यंत आमचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच असेल. दरम्यान उद्या यासंदर्भात मुंबईत बैठक होणार आहे. त्या बैठकित काय निर्णय होणार आहे, त्या नूसार आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. काही तोडगा न निघाल्यास ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात 'एसईए'चे जवळपास ३५० अभियंते आहेत व ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत,असे 'एसईए' अमरावतीचे सहसचिव गजानन गोद यांनी सांगितले.

 

'एसइए' वगळता इतर अभियंते आहेत
या आंदोलनात 'एसईए'च्या अभियंत्यांनी कार्यालयीन सिम कार्ड काढून ठेवले आहेत. त्यामुळे मोबाईल बंद आहेत. मात्र 'एसइए' वगळता इतर अभियंते कामावर आहेत. तसेच ग्राहकांच्या सेवेसाठी इतर अधिकारी उपलब्ध आहेत. त्यामुळे महावितरणच्या सेवेवर काही परिणाम झालेला नाही. ग्राहकांनाही अद्याप त्याची फारशी झळ बसली नाही. सुहास मेत्रे, अधीक्षक अभियंता.

बातम्या आणखी आहेत...