आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रश्नावर विराेधकांप्रमाणे सत्ताधाऱ्यांचाही गोंधळ; तटकरे- पाटील यांच्यात खडाजंगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील विधान परिषदेत बुधवारी कामकाजाचा तिसरा दिवसही गोंधळाने वाया गेला. मागचे दोन दिवस विरोधकांनी कामकाज बंद पाडले हाेते, तर बुधवारी चक्क सत्ताधाऱ्यांनीच त्याची पुनरावृत्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि सभागृहनेते तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर आज जोरदार आरोप केले. कामकाज चालवण्यावरून दोघांमध्ये जोराची खडाजंगीसुद्धा झाली. या गाेंधळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले. 


सकाळी बारा वाजता कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रश्नोत्तरे पुकारली. त्यावर विरोधी बाकावरून बाेंडअळी व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर स्थगन प्रस्तावावर (२८९ अन्वये) बोलण्याची मागणी होऊ लागली. त्याला आक्षेप घेत सत्ताधारी बाकांवरील सदस्य उठून विरोध करू लागले. त्यामुळे सभापतींनी ३० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानतंर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज सुरू केले. उपसभापतींनी सुनील तटकरे यांना स्थगन प्रस्ताव कसा होतो यावर दोन मिनिटे बोलण्यास संमती दिली. त्याला संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट आणि सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हरकत घेतली.

 

पाॅइंट आॅफ आॅर्डरवर मुद्दा मांडण्याची मागणी चंद्रकांत पाटील करत होते. मात्र उपसभापतींनी ती नाकारात तटकरे यांना बोलण्यास अनुमती कायम ठेवली. त्यावर सत्ताधारी बाकांवरील भाजप सदस्य उठून उभे राहिले. त्यांनी जोरदारच्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. गोंधळ वाढत गेल्याने पुन्हा ३० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. हा गाेंधळ पुढेही सुरूच हाेता.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, काय म्‍हणाले सुनिल तटकरे तसेच चंद्रकांत पाटील व अबू आझमींची मागणी...

 

हेही वाचा,
- बोंडअळीवरील ‘लक्षवेधी’वर उत्तरच नाही; सरकारची नामुष्की

- बोंडअळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याची अंधापुरीत गळफास घेऊन आत्महत्या

बातम्या आणखी आहेत...