आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सनसनाटी टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही, असा सनसनाटी टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 3 वर्षांपासून फक्‍त धमकी देण्याचेच काम करीत आहेत. धमकी देण्यासाठी त्यांनी जो वेळ घातला तो सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी दिला, तर त्यांचे तरी भले होईल, असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला.

 

सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, 'हल्लाबोल' आंदोलन करणार्‍यांचे 'डल्लाबोल' पुरावे आपल्याकडे आहेत, असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला होता. याच वक्‍तव्याला सुप्रिया सुळेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये करणे, अशोभनिय आहेत. फडणवीसांनी धमकी देणे थांबवावे, इतकाच वेळ त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी दिला तर त्यांचे तरी भले होईल.

बातम्या आणखी आहेत...