आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाचे बनावट कातडे प्रकरणच बनावट असल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वरूड येथे जप्त करण्यात आलेले वाघाचे बनावट कातडे प्रकरणच बनावट असल्याचा संशय असून आंतरराष्ट्रीय बाजारात वाघाच्या कातड्याची किंमत ५० लाख रुपये असल्याने हे बनावट प्रकरण रचण्यात आल्याची दाट शक्यता वन्यजीव संरक्षक नीलेश कांचनपुरे यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली. तसे पत्रच कांचनपुरे यांनी राज्याच्या वन सचिवास लिहिले आहे.


वन अधिकाऱ्यांमधील वाढलेला वाद, परस्पर विरोधी वक्तव्ये, वरिष्ठ धमकी देत असल्याचा कनिष्ठ वन अधिकाऱ्यांचा आरोप तसेच या प्रकरणी जो अहवाल सादर करण्यात आला त्या अहवालातील नोंदी आणि प्रत्यक्ष घडलेल्या घटना यात कुठेही मेळ बसत नसल्यामुळे एकूणच वाघाची बनावट कातडी प्रकरणच बनावट असल्याचा संशय बळावला आहे. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी तसेच दिशाभूल करण्यासाठी टाकलेला हा डाव आता अंगलट येत असल्याचे बघून वन अधिकारी हात झटकत असल्याचे मत वन्य प्राणी संरक्षकांनी व्यक्त केले.

 

रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मेळघाट व्याघ्र क्राइम सेलचे प्रमुख विशाल माळी आणि मानद वन्यजीव रक्षक बनसोड यांनी मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील मुलताई येथील गेहूबारसा गावातील तस्कर सुखदेव धोटेला दुचाकीवर वाघ व बिबट्याची कातडी घेऊन जाताना वरुड वनपरिक्षेत्रात सायंकाळी साडेसात च्या सुमारास अटक उर्वरित. पान ४


संपत्तीची चौकशी करण्याचा काय अधिकार ?
वाघाच्या बनावट कातडी प्रकरणाने अचानक वेगळे वळण घेतले असून कनिष्ठ वन अधिकाऱ्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी हे संपत्तीची चौकशी करण्याची धमकी देत असल्याची तक्रार असलेले पत्र राज्याच्या वन सचिवांना पाठवले आहे. याबाबत बोलताना मला कोणाच्याही संपत्तीची चौकशी करण्याचा काय अधिकार? हा आरोप हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण रेड्डी यांनी दिले. यातून कनिष्ठ अधिकारी जबाबदारीने काम करत नसल्याची वरिष्ठांची खात्री पटली असून त्यांना कनिष्ठांच्या कामाच्या पारदर्शकतेवर ही प्रश्नचिन्ह असल्याचे दिसून येते. सहायक वनरक्षक, वरुड राजेंद्र बोंडे यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र ते आता या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तयार नसल्याचेही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी यांनी सांगितले.

 

वन्यप्रेमींची दिशाभूल करण्याचे काम
वन अधिकाऱ्यांच्या आपसातील भांडणामुळे एक महिना उलटूनही घटनेच्या तपासात दिरंगाई सुरू आहे. यामुळे मूळ आरोपींनाही अद्याप शिक्षा झाली नाही. एकूण या प्रकरणी वन्यप्रेमींची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
- नीलेश कांचनपुरे, अध्यक्ष, वार संघटना.

 

बातम्या आणखी आहेत...