आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीसाठी सर्वच विरोधी पक्षांशी बोलणी सुरू : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -  राज्यात भाजपविरोधात महाआघाडीसाठी बसप, समाजवादी पक्ष, डाव्यांसह सर्वच विराेधी पक्षांची बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाआघाडीसाठी सुरुवातीला राष्ट्रवादीशी चर्चा सुरू करण्यात आली. येत्या २० जून रोजी दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांची समिती एकत्र बसून चर्चा करणार आहे. राज्यात काही पक्ष राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीकडे राहणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघासह रिपब्लिकन पक्षांशीही यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.  


‘संघाच्या लाेकांना पेन्शन नकाेच’  
अाणीबाणीत कारावास भाेगलेल्या व्यक्तींना पेन्शन देण्याबाबत सरकारचा निर्णय हा स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान या दोन्हींचा अवमान आहे, अशी टीका अशाेक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना घरे देण्याचा निर्णय जाहीर करून दोन वर्षे होऊन गेली तरी त्यावर कारवाई झाली नाही. आणीबाणीला तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पाठिंबा देऊन माफी मागितली होती. म्हणून संघाच्या नेत्यांना या योजनेतून वगळावे, अशी मागणीही चव्हाणांनी केली.

 

बातम्या आणखी आहेत...