आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकविताना विद्यार्थी बनून शिक्षकाने पटकावले 6 सुवर्ण; सचिन जोशी यांनी केली किमया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीक्षांत समारंभात सर्वाधिक सुवर्ण पदके पटकावणारे सचिन अरुण जोशी यांचा पदके देऊन सत्कार करताना विद्यापीठीचे कुलगुरु डॉ. चांदेकर. - Divya Marathi
दीक्षांत समारंभात सर्वाधिक सुवर्ण पदके पटकावणारे सचिन अरुण जोशी यांचा पदके देऊन सत्कार करताना विद्यापीठीचे कुलगुरु डॉ. चांदेकर.

अमरावती- विद्यादान करीत विद्यार्जन करीत यवतमाळ जिल्ह्याच्या पाटणबोरी येथील शिक्षक सचिन अरुण जोशी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) सहा सुवर्ण पदकांची कमाई केली. नियमित विद्यार्थ्यांना मागे टाकत बहि:शाल विद्यार्थी म्हणून सचिनने यंदाच्या दीक्षांत समारंभात सर्वाधिक सुवर्ण पटकाविण्याचा मान मिळविला. 


यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील मूळ निवासी असलेले सचिन अरुण जोशी हे व्यवसायाने शिक्षक आहेत. केळापूर तालुक्याच्या पाटणबोरी येथील श्री शिव छत्रपती उच्च माध्यमिक विद्यालयात मागील १२ वर्षांपासून सचिन विद्यादानाचे कार्य करीत आहे. विद्यादान करताना विद्यार्जन करण्याचा छंद त्यांनी सोडला नाही. याचे फलीत म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बहि:शाल विद्यार्थी म्हणून त्यांनी उन्हाळी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या वाड्:मय पारंगत (मराठी) परीक्षेत सर्वाधिक सहा सूवर्ण पदके पटकाविली. यामध्ये प्रथम श्रेणीत प्रथम स्थान प्राप्त केल्याबाबत राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज सुवर्ण पदक, सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने श्रीमती शांताबाई शंकरराव लोंढे सुवर्ण पदक, सर्वाधिक गुण प्राप्त करुन प्रथम श्रेणीसह प्रथम स्थान प्राप्त केल्याने डॉ. व्ही. बी. उपाख्य भाऊसाहेब कोलते सुवर्ण पदक, श्रीराम नामदेवराव शेळके सूवर्ण पदक, सर्वाधिक गुण प्राप्त करुन गुणवत्ता यादीत प्रथम स्थान प्राप्त केल्याने स्व. दिनकर विष्णू जोशी स्मृती सुवर्ण पदक, प्राचार्य श्रीहरी गायकवाड सुवर्ण पदक आदी सहा सुवर्ण पदक तसेच कविश्रेष्ठ सुरेश भट रोख पुरस्कार १६२५ रुपये प्राप्त केला. ज्यांच्या नावाने विद्यापीठाचे नाव आहे, असे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आशिर्वादाने पुरस्काराचा हा ठेवा मिळाल्याचे सचिन जोशी म्हणतात. संत गाडगेबाबा यांनी दशसूत्रीतून शिक्षणाबाबत महत्वपूर्ण संदेश दिला आहे. शिक्षण हे वेगळ्या पद्धतीने देखील घेता येते हे बहि:शाल विद्यार्थी म्हणून प्राप्त केल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. 

बातम्या आणखी आहेत...