आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला पळवले; राणीगावात दोन गटांत तणाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारणी - अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी शेख कलीम शेख सलीम (वय २०, रा. राणीगाव) याच्यावर शनिवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणावरून शुक्रवारी रात्री दोन गटात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला असून, गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


सोळा वर्षीय मुलगी सायंकाळी मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. दरम्यान शेख कलीम याने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मित्राच्या मदतीने मुलीला दुचाकीने पळवून नेले. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या मैत्रिणीला विचारपूस केल्यानंतर ती शेख कलीम याच्यासोबत पळून गेल्याचे सांगितले. दरम्यान घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर दोन गटात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धारणीवरून पोलिस पथक रवाना करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी मुलीच्या पालकांनी धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शेख कलीम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे शोधपथक फरार मुलगी व शेख कलीमचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...