आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकारी व पत्नीला मारहाण केल्याचा आमदार पारवेंवर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सहायक पोलिस निरीक्षक अजय गर्जे आणि त्यांच्या पत्नीला भाजप आमदार सुधीर पारवे यांनी मारहाण केल्याची तक्रार उमरेड पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. आमदार सुधीर पारवे यांनी देखील अजय गर्जे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गर्जे आणि आमदार सुधीर पारवे यांच्या तक्रारीनंतर पोलिस चौकशी करत असून कोणावरही अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. सुधीर पारवे आमदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे, का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. नागपुरातील सदर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गर्जे यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या.  अजय गर्जे हे  रस्त्यात टायरचा पंक्चर काढत असताना भाजप आमदार सुधीर पारवे यांची गाडी आली. तेव्हा आमदाराच्या गाडीला अजय गर्जे यांच्या गाडीचा टायर लागल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत  गर्जे यांचे कपडे फाटले. या मारहाणीविरोधात अजय गर्जे यांनी उमरेड पोलिस ठाण्यामध्ये आमदार सुधीर पारवे आणि त्यांच्या पीए विरोधात तक्रार दाखल केली. तर आमदार पारवे यांनी देखील गर्जे यांच्याविरोधात तक्रार दिली.  


गर्जे दारूच्या नशेत होते : पारवे  
या संदर्भात आमदार सुधीर पारवे यांच्याशी संपर्क साधला असता गर्जे दारूच्या नशेत होते. त्यांची मेडिकल टेस्टही करण्यात आली. आपले बिंग फुटू नये म्हणून त्यांनी माझ्याविरोधात तक्रार दाखल आहे. रात्री मी घरी जात असताना ते अचानक गाडीसमोर आले. माझ्या गाडीच्या चालकाने वेळीच ब्रेक दाबले नसते तर अपघात झाला असता. त्यानंतर त्यांनी दमदाटी केल्याचेे पारवे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...