आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील हत्या प्रकरणाच्या आरोपीला पोलिसांना तुरी देऊन जाणे चांगलेच महागात पडले. सुनावणीसाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात आलेल्या विनोद कानबाले नामक या आरोपीने पोलिसांना हिसका देऊन हातकड्यांसह पलायन केले. मात्र, इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून पडल्याने हातपाय मोडले. संतापलेल्या पोलिसांनीही जखमी अवस्थेतील विनोदला तब्बल पाऊणतास वेदनेने विव्हळत सोडले होते.
विविध गुन्ह्यांतील ८ आरोपींना जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आणले होते. सर्व आरोपींना न्यायाधीशांपुढे हजर करण्यात आले. सुनावणीनंतर आरोपींना कारागृहात परत घेऊन जाण्याची तयारी पोलिसांनी केली. तितक्यात विनोद कानबाले या हत्येच्या प्रकरणातील आरोपीने पोलिसांना हिसका देत हातकडीसह पलायन केले. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून त्याने इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून थेट उडी घेतली. परंतु, त्यातच त्याच्या पायाला चांगलीच दुखापत झाली. मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच गराडा घातला. त्यानंतर पाऊणतास आरोपी विव्हळत पडला होता. मात्र, संतापलेल्या पोलिसांनी त्याला घटनास्थळी तसेच पडून राहू दिले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. सुमारे पाऊण तासांनी पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेऊन उपचार केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.