आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात उभारणार देशातील पहिला तिहेरी उड्डाणपूल;वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- संत्रानगरी ते मेट्रो सिटी असा प्रवास करणाऱ्या नागपुरात मेट्रो रेल्वे तिहेरी उड्डाणपूल (थ्री-लेअर फ्लायओव्हर) साकारणार आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच तिहेरी उड्डाणपूल असेल.  हा उड्डाणपूल म्हणजे बांधकामाचा एक अनाेखा व अप्रतिम नमुना ठरणार आहे.    


उपराजधानी नागपुरात मेट्रो रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू असून शहरातील वर्धा मार्गावर डबलडेकर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. यात  खालच्या पुलावरून वाहने जाणार असून वरच्या बाजूने मेट्रो धावणार आहे. तर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मेट्रो देशातील पहिला तिहेरी उड्डाणपूल साकारणार आहे. ग्राउंड प्लस थ्री-लेअर असे याचे स्वरूप राहणार आहे. यात शहरातील विविध भागात जाणाऱ्यांसाठी खालून रस्ता मार्ग, त्यावर गड्डीगोदाम परिसरात रेल्वेमार्ग आणि तिसऱ्या लेअरमध्ये शहराबाहेर जाणाऱ्यांसाठी तर पुलाच्या सर्वात वर मेट्रोसाठी अप्पर पोर्शन असणार आहे. अशा प्रकारचा ग्राउंड प्लस थ्री लेअर असलेला देशातील पहिलाच उड्डाण पूल असेल. खर्च, वेळ आणि जागेची बचत करणारे हे इन्फ्रास्ट्रक्चर  सर्वार्थाने अभिनव राहणार आहे. या उड्डाणपुलाचे इन्फ्रास्ट्रक्चर वाहतुकीसह सौंदर्यात भर घालणारे असेल. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण आणि नियंत्रणासाठी अशा प्रकारचे अभिनव फ्लायओव्हर काळाची गरज झाले आहेत. वाहतुकीची सुविधा, वाहनचालकांची सोय आणि प्रगतीचा टप्पा असे तिहेरी उद्देश हा अभिनव उड्डाणपूल पूर्ण करेल यात शंका नाही.    

 

दाेन वर्षात पूर्ण हाेईल उड्डाणपूल : दीक्षित 
वाढती वाहतूक या गोष्टी लक्षात घेऊन नागपुरात हा ग्राउंड प्लस थ्री-लेअर उड्डाणपूल साकारला जाणार आहे. एलआयसी चौकातून कामठीच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर गड्डीगोदाम परिसरात या पुलाचे थ्री-लेअर राहतील. शहरातील विविध भागात जाणाऱ्यांसाठी सर्वात खालचा ग्राउंड पोर्शन असेल. तर शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी फर्स्ट लेअर राहणार आहे. येत्या दोन वर्षात हा पूल पूर्ण होईल, असा विश्वास नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...