आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांची मागणी सुरू असतांना सरकारने जाहीर केले लाभार्थींची नावे आणि फाेटाे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कर्जमाफीच्या लाभार्थींची नावे जाहीर करा, या मागणीवरून विरोधकांकडून हल्लाबोल सुरू असताना राज्य सरकारने काही कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांची नावे आणि छायाचित्रे जारी केली आहेत. कर्जमाफीवरील आतापर्यंत राज्यात ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. विरोधकांनी त्यावर आक्षेप घेत कर्जमाफी नेमकी कोणाला दिली, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी केली होती. 

 

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा स्तरांवरील लाभार्थी शेतकऱ्यांची काही नावे तसेच त्यांची छायाचित्रे जारी केली आहेत. या लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचा एसएमएस संदेश पाठविण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील ६९ हजार ३०९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्यापैकी ११ हजार ५७८ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...