आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोरणमाळ येथील तलावात आढळला 50 किलो वजनाचा सिल्व्हर आफ्रिकन जातीचा मासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या आदिवासी तरुणांना 50 किलो वजनाचा सिल्व्हर आफ्रिकन जातीचा मासा सापडला आहे. नेहमी प्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मासेमारी साठी जाळ टाकलं असता त्यांच्या जाळ्याला हा अवाढव्य असा मासा लागला.

 

त्यानंतर हा मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तोरणमाळ येथील यशवंत तलावात बाराही महिने मोठ्या प्रमाणात पाणी असते या ठिकाणी मासेमारी करून आदिवासी आपला उदर निर्वाह करीत असतात.  या माश्‍याला पकडल्‍यानंतर संपुर्ण गावक-यांनी या महाकाय माशावर ताव मारला.


यशवंत तलावात मागे 10 वर्षांपूर्वी ही असा मोठा मासा सापडल्याचे गावकऱ्यांनी सांगितलं आहे. तोरणमाळ सातपुड्याच्या दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी मोबाईल नेटवर्क सुद्धा नाही. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी या माश्याची माहिती सोशल मीडियावर टाकल्यानंतर ही बाब समोर आली. एवढा मोठा मासा सापडल्यानंतर जिल्ह्यात सध्‍या हा चर्चेचा विषय झाला आहे. तलावात एवढ्या मोठ्या आकाराचा मासा असणे आश्चर्य चकीत करणारी बाब असल्याची प्रतिक्रिया तोरणमाळ ग्रामपंचायत सदस्य जीवन रताळे यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...