आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिलेबीवाल्याच्या घरी सव्वा तेरा लाखांची चोरी; कामावरून कमी केलेल्या नोकरावर संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच कपाटातून सव्वा तेरा लाखांची रोकड लंपास झाली. - Divya Marathi
याच कपाटातून सव्वा तेरा लाखांची रोकड लंपास झाली.

अमरावती- शहरातील इर्विन चौकात जिलेबीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातील कपाटातून तब्बल सव्वा तेरा लाख रुपयांची रोख लंपास झाल्याची घटना शनिवारी (दि. १४) रात्री घडली. ही चोरी एक दिवसापूर्वीच कामावरून कमी केलेल्या नोकरानेच केल्याचा संशय जिलेबी व्यावसायिकाने नागपुरी गेट पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वर्तवला आहे. 


मुळचे बऱ्हाणपूर येथील रहिवासी व शहरातील जमिल कॉलनीमध्ये भाड्याने राहणारे अबरार ऊल हक मो. इब्राहिम (२८) यांचा इर्विन चौकात मावा जिलेबी विक्रीचा व्यवसाय आहे. जमिल कॉलनी व चित्रा चौकातही त्यांचे जिलेबीची दुकाने आहेत. त्यांना नागपुरात दुकान खरेदी करायचे असल्यामुळे त्यांनी ही रक्कम घरात ठेवली होती. त्यांच्या दुकानावर काम करणारे सात व्यक्तीसुद्धा त्यांच्याच सोबत जमिल कॉलनीमध्ये एकत्रच असतात. १४ जुलैला रात्री सात ते दहा वाजेदरम्यान घरातील लोखंडी कपाटातील अठरा लाखांपैकी १३ लाख २५ हजार रुपयांची रोख लंपास करण्यात आली. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अबरार घरी पोहोचले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. नागपुरी गेट पोलिसांनी पाहणी केली असता कपाटाला रक्ताचे डाग दिसले.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली. संतोष नामक नोकरचा शोध पोलिस घेत आहेत. 


दूधवाल्याचा फायदा 
दूधवाल्याकडून दूध मोजून घेताना संतोष दूध वाल्याचा फायदा करून आमचे नुकसान करायचा. त्यामुळे १३ जुलैला त्याला कामावरून कमी करून गावी जाण्यास सांगितले. मात्र तो गावी गेला नव्हता. त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचे अबरार यांनी पोलिसांना सांगितले आहे. 


सर्वच दिशेने तपास 
कामावरून काढलेल्या नोकरासह कपाटावर रक्ताचे डाग आढळल्याने कामावरच्या सर्वांच नमुने तपासणार आहे. 
- दिलीप चव्हाण,ठाणेदार, नागपुरी गेट. 

बातम्या आणखी आहेत...