आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात यंदा विजेच्या मागणीने गाठला उच्चांक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मागील वर्षी एप्रिल महिन्यात १८ हजार ते १८ हजार ५०० मेगावॅटच्या घरात असलेल्या विजेच्या मागणीने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे विजेची मागणीही दिवसेंदिवस वाढत चालली असून २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार २५४ मेगावॅट विजेची मागणी होती. कुठेही भारनियमन न करता   मागणी एवढा वीजपुरवठा करणे महावितरणला शक्य झाल्याची माहिती अध्यक्ष अन् व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली आहे. 


वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणामुळे आपल्याला हे साध्य करता आले. प्रचंड उकाड्यामुळे विजेच्या मागणीचे आकडे फुगत असताना मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात वसुलीचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. 


व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक म्हणजे वीज मीटर असून महावितरणकडे नव्या वीज मीटरचा कोणताही तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात सिंगल फेज व थ्री फेजचे मीटर खरेदी करून सर्व परिमंडळांना त्यांच्या गरजेनुसार उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, आजही काही शाखा किंवा उपविभागीय कार्यालयांकडे संख्येने मीटरचा साठा असल्याचे प्रलंबित वीज जोडणी यादीवरून दिसून आले आहे. शेतीपंपांच्या वीज जोडण्या वगळता १ लाख ४२ हजार एवढी पैशाचा भरणा केलेल्या प्रलंबित वीज जोडण्यांची संख्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


काही ठिकाणी पायाभूत सुविधा नसल्यामुळे वीज जोडणी देणे शक्य नसेल पण, ज्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत त्या ठिकाणी नवी वीज जोडणी देण्यात अडचण असायला नको. तसेच वीज जोडणी देण्यास वेळही लागायला नको. मोठ्या संख्येत ग्राहक वीज जोडणीसाठी वाट बघत असताना त्यांना नवी वीज जोडणी दिली जात नाही याची व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली आहे. मीटर उपलब्ध असताना ते न देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेणे होय, असा इशाराही कुमार यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...