आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला जात असलेल्या वाहनाला भीषण अपघात; तीन ठार, पाच गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी- येथील महावीर भवन येथे लग्न समारंभास जात असताना घुगूस मार्गावरील टोल नाक्याजवळ स्कॉर्पिओ वाहन ट्रकवर आदळल्याने भीषण अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत जैन ले- आऊट परिसरातील तीन ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार, दि. २४ जुनला १ वाजताच्या दरम्यान घडली. 


जैन लेआऊट परिसरात वास्तव्यास असलेल्या भोयर आणि देठे यांचा आज येथील महावीर भवन येथे लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. याकरिता त्याच परिसरातील पाहुणे मंडळी आणण्याकरता स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच- २९-एआर-१४३४ ने नवरदेवाचा मित्र प्रशांत हा गेला असता पाहुणे घेऊन येत असताना प्रशांतचा अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन दुभाजक ओलांडून ट्रक क्रमांक एमएच-३१-एपी-७०६८ वर आदळला. यात प्रशांत देवराव खाडे वय २४ वर्ष, शशिकला पंढरीनाथ कुबडे वय ४८ वर्ष, तसेच प्रेमीला रामकृष्ण आस्वले वय ४५ वर्ष रा. जैन लेआऊट या तिघांचा दुर्दैवी अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुमन बापूजी बोढे वय ६० वर्ष, प्रतिभा राजू बोढे वय ३४ वर्ष, मंगला शेडके वय ३८ वर्ष, अतुल बदखल वय २४ वर्ष तसेच कमलाबाई शेडके वय ६५ वर्ष हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्याचबरोबर नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती वणी पोलिसांना दिली. 


पोलिसांच्या मदतीने मृतकासह जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयात मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, धनंजय त्र्यंबके, आजिद शेख यांनी तातडीने रुग्णांना रवाना करण्यासाठी रूग्णवाहिकेची व्यवस्था केली. तर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, संजय पिंपळशेंडे यांनीही रुग्णालयात येऊन रुग्णांची चौकशी केली. 

बातम्या आणखी आहेत...