आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये तीन सतरा वर्षीय युवतींना पळवले; पोलिसांत तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातून तीन सतरा वर्षीय मुलींना फुस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि. १४) उघडकीस आली. या घटना फ्रेजरपुरा, राजापेठ व गाडगेनगर पोिलस ठाण्याअंतर्गंत घडली. शनिवारी (दि. १०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पीडित मुलगी यशोदा नगरातील घरासमोर अंगणात उभी होती.

 

दरम्यान अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळून नेले. मंगळवारी (दि. १३) फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी न सांगता निघून गेली.


मायानगरात घडलेल्या या घटनेत सदर मुलीला कुणीतरी पळवून नेले असावे अशी तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी राजापेठ पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १२) दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिसरी घटना गाडगेनगरातील जयंत कॉम्प्लेक्स येथे घडली. सतरा वर्षीय पीडित मुलीला सोमवारी (दि. १२) शंतनु राजाभाऊ राऊत (वय ३२, रा. आष्टी पो. चिचोली धामणगाव) याने दुचाकीसह पळवून नेले. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून शंतनु राऊतविरुद्ध मंगळवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

बातम्या आणखी आहेत...