आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीच्या बागेत घुसला वाघ, डुक्कर केले फस्त, पहायला उसळली लोकांची गर्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बोर अभायरण्यालगतच्या सावंगी देवळी शिवारातील एका केळीच्या बागेत मंगळवारी दुपारी वाघ घुसला असून त्याने एका रानडुकराची फस्त केले.  केळीच्या बागेत ठाण मांडून बसलेल्या वाघाला जंगलात परतवण्यासाठी वन कर्मचा-याचें शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. वाघ बागेत घुसल्याची माहिती मिळताच गावक-यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार वाघ शिकार करताना जंगलालगत असलेल्या शेतात घुसला. मात्र वाघाने कोणावरही हल्ला केला नाही. पण नंतर लोकांची गर्दी पाहून तो केळीच्या बागेत पळाला. वनविगाने त्याला जेरबंद न करता त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. वाघ गावात आल्याने लोकांमध्ये देखील भितीचे वातावरण आहे. या वाघाला अनेकांनी आपल्या मोबोईल कॅमे-यांमध्ये कैद केले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...