आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी पहिलीसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप', दोन मुलंही झाले, तरीही दुसरीसोबत केले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात राहणाऱ्या एका युवतीचा मागील वर्षी नागपुरातील एका युवकासोबत विवाह झाला. विवाह झाल्यानंतर मुलीकडील मंडळी मुलीला आणण्यासाठी वरातीला गेले असता वराच्या घरी मंडप नाही किंवा लग्नाचा उत्साह नव्हता. दरम्यान त्यानंतर काही दिवसातच मुलीच्या वडीलांनी या वराबाबत माहिती काढली असता तो मुलगा या लग्नापूर्वीच एका   महिलेसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप' असून त्यांना दोन अपत्यसुद्धा आहेत. या प्रकरणाने युवतीच्या वडीलांना जबर धक्का बसला. त्यामुळे त्यांनी गुरूवारी (दि. २४) रात्री फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या वरासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 


राहुल रेवकनाथ साळवे (३३), रेवनाथ साळवे (७०), प्रभाकर सोनारे (६०), महेन्द्र सोनारे (५५) आणि अमीत पाटील (४५, सर्व रा. झिंगाबाई टाकळी परिसर, नागपूर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


शहरातील एका मुलीचे २९ मे २०१७ ला वसंत हॉलमध्ये राहुल साळवेसोबत रितीरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर नवरी मुलगी तिच्या पतीसोबत नागपूरला गेली. दरम्यान, ऐन लग्नाच्यावेळीच राहुल व त्याच्या काही नातेवाईकांनी वधूपित्याला सहा लाख रुपये हुंडा मागितला. तसेच मुलीच्या अंगावर ३० ग्रॅमचे दागिने आणि नवरदेवाला गोफ व अंगठी व नागपूरवरून पाहुण्यांना आणण्यासाठी ५० हजार रुपये वाहन खर्च दिला. दुसऱ्या दिवशी मुलीचे वडील व अन्य पाहुणे मुलीला आणण्यासाठी वरातीला गेले. त्यावेळी राहुलच्या घरी मंडप नव्हता किंवा घरात लग्न असल्याचे कोणतेही वातावरण नव्हते. दरम्यान, मुलीला घेवून दुसऱ्या दिवशी वडील व पाहुणे अमरावतीला परत आले. त्यानंतर तीन दिवस राहुल त्याच्या पत्नीला घेण्यासाठी अमरावतीला अाला नाही. 


तीन दिवसानंतर तो त्याच्या नातेवाईकांसह आला व पत्नीला घेवून नागपूरला गेला. त्यानंतर आठ ते दहा दिवस त्याने पत्नीसोबत संबंध केले नाही. तसेच तो घरातही थांबत नव्हता. त्यामुळे नववधूने ही बाब तिच्या वडीलांना सांगितली. त्यामुळे त्यांनी नागपूरात जावून राहुल साळवेबाबत सखोल माहिती घेतली. त्यांना असे माहीत झाले की, राहुलचे या लग्नापूर्वीच एका महिलेसोबत संबंध आहे व मागील काही वर्षांपासून या महिलेसोबत त्याचा 'घरठाव' आहे. इतकेच नाही तर त्याला या महिलेपासून दोन अपत्यसुद्धा झाली आहे. ही माहिती मिळाल्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यामुळे काही दिवसातच ते मुलीला घेवून निघून आले. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी गुरूवारी रात्री फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी राहुल व त्याच्या इतर चार नातेवाईकांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...