आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळजवळ शिवशाही बसला भीषण अपघात, 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 18 गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ-  बोलोणा गावाजवळ यवतामाळहून नागपूरकडे निघालेल्या शिवशाही बसने समोरुन येणा-या दुचाकीला धडक दिली. या नंतर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस उलटल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले. ही दुर्घटना दुपारी 3.30 वाजता घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळवरुन नागपूरकडे निघालेल्या शिवशाही बसने समोरुन येणा-या स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिलीय यानंतर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात दुचाकीवरीलएक इसम आणि शिवशाही बसमधील एक महिला जागीच ठार झाले तसेच पाच जण गंभीर जखमी झाले. इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले. जखमींना कळंब येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर गंभीर जखमींना नागपूर व यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. 

 

पुढील स्लाईडवर पहा भीषण अपघाताचे फोटो.....

 

बातम्या आणखी आहेत...