आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पशिक्षित कुटुंबातील दोन बहिणींना तीन सुवर्ण; शिरसाट भगिनींची कला शाखेत कामगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करुणा आणि भावना शिरसाट. - Divya Marathi
करुणा आणि भावना शिरसाट.

अमरावती- आर्थिक परिस्थितीला दोष देत शिक्षण पूर्ण न करू शकल्याचे अनेक जण रडगाणे गातात. मात्र अकोला जिल्ह्याच्या बोरगाव मंजू या छोट्याशा गावातील जेमतेम शिक्षण घेतलेल्या कुटुंबात करुणा आणि भावना या दोन सख्या बहिणी परिस्थितीवर मात करत शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी तीन सुवर्ण पदकांची लयलूट केली. 


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शुक्रवारी करुणाला दोन, तर भावनाला एक सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. विपरीत परिस्थितीत विद्यार्जन करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्यात दारोदारी कुल्फी, प्रसंगी विविध वस्तू विक्रीचा व्यवसाय करणारे बोरगाव मंजू येथील बंडू शिरसाट यांच्या दोन मुलींनी कला (बीए) शाखेच्या उन्हाळी २०१७ या परीक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. 

 

प्रशासकीय सेवेत... 
भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न करुणा व भावना या दोघी बहिणींना अंगी बाळगले आहे. जिल्हाधिकारी होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 


आई सहावी, तर वडील दहावी 
वडील दहावी, तर आईचे जेमतेम सहाव्या वर्गापर्यंत अशा अल्पशिक्षित असलेल्या कुटुंबात एकाच वेळी तीन सुवर्ण व एका रौप्य पदकाची कमाई करत दोघी बहिणींना बोरगावचा नावलौकिक वाढवला आहे. कमी शिक्षित असले म्हणून काय झाले, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेताना आई-वडिलच मार्गदर्शक असल्याचे दोघी बहिणी मोठ्या अभिमानाने सांगतात.

बातम्या आणखी आहेत...