आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५.१५ लाख रुपयांच्या रेल्वे तिकीटांसह तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- रेल्वेच्या आरक्षित तिकीटा साठी अधिक पैसे घेत ते अनधिकृतरीत्या विकल्या जात अाहे,अशी माहिती मिळाली. यावरून पथक तयार करून शनिवारी २३ जूनला सकाळी ११ वाजता तपासणी करण्यात आली. यात तीन जणांवर कारवाई करीत ५ लाख १५ हजार ७२५ रुपयांच्या २९३ ई-तिकीट, कॉम्प्युटर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


या संदर्भात सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वर्धेत रेल्वेच्या आरक्षित तिकिटांची अनधिकृतरीत्या विक्री होत अाहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. यावरून नागपूर विभागाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकारी ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात नागपूरचे भगवान डी. इप्पर, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे, वर्धेचे ए.के. बारळे, सचिन दलाल व विभागीय कार्यालयाचे अमित बारापात्रे, अश्विन पवार, अशोक खान यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने शनिवारी २३४ जूनला वर्धेतील ई-तिकीट विक्री करणाऱ्या ठिकाणांची चौकशी केली. यात विशान डांगे (२७), विजय मसने (३४) रा. सावंगी (मेघे) व नितेश भोंगळे (३१) रा. वर्धा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार ७३५ रुपयांच्या २९३ ई-तिकीटा, कॉम्प्युटर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. हे तिघेही ६१ 'फेक आयडी'च्या माध्यमातून प्रवाशांना ऑनलाइन आरक्षित रेल्वे तिकीट काढून देत अधिक दराने विक्री करीत होते,अशी माहिती देण्यात आली. 


दरम्यान या प्रकरणी वर्धा रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ए.के. बारळै व सचिन दलाल करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...