आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र ताेडण्याची भाषा करणाऱ्यांची आता गय नाही; माजी खासदार प्रकाश जाधव यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राशीच बेईमानी करायची, असे काही लोकांचे चालले आहे. आतापर्यंत सर्व पदे येथे भूषवली. मानसन्मान, वेतन, भत्ते, लाभ, एवढेच नव्हे तर निवृत्ती वेतनही महाराष्ट्राचेच घेत आहेत. त्या नंतरही महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहे. यापुढे अशी भाषा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी पत्रपरिषदेत दिला. 


अॅड. श्रीहरी अणे असोत वा माजी पोलिस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती असोत. त्यांच्यासह वेगळ्या िवदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या सर्वांनीच महाराष्ट्राचे मीठ खाल्ले आहे. आजपर्यंत पदावर असताना या लोकांनी विदर्भासाठी काय केले, हे यांना सांगता येत नाही. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे जाधव म्हणाले. शासनाची विविध प्राधिकरणे तसेच वेगवेगळ्या पॅनेलवर अनेक वकील नियुक्त आहेत. त्याचे लाभही ते घेत आहेत. महाराष्ट्र तोडण्याच्या चळवळीत सहभागी असलेल्या अशा सर्व वकील तसेच इतरांची चौकशी करण्यात येऊन त्यांचे सर्व लाभ बंद करण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी केली. एकेकाळी विदर्भाच्या हातात सत्ता नाही, मंत्रिमंडळात विदर्भाचे मंत्री नाही म्हणून विकास होत नाही, अशी ओरड होती. आज मुख्यमंत्री, उर्जा मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री, अर्थ मंत्री सर्वच नागपूर-विदर्भातील आहेत. त्यामुळे विदर्भाच्या विकासाची ओरड आता करता येणार नाही. या मंत्र्यांनी विदर्भाचा विकास करून घ्यावा. 


विकास होईल तिथे आम्ही सोबत आहोत, होणार नाही तिथे विकास करण्यास सरकारला बाध्य करू, असे जाधव यांनी स्पष्ट केले. नोटबंदी झाल्यापासून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे. असे असले तरी शेतकरी आत्महत्या या राज्याला शोभनीय नाही. त्या थांबाव्यात यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे. 

बातम्या आणखी आहेत...