आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीम जिल्हा परिषद विभागात ठरली अव्वल; स्वच्छ भारत अभियानाला सर्वाधिक गुण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम- निकालदर्शक अभिलेखाद्वारे विभागीय आयुक्तांनी केलेल्या मार्च महिन्यातील मुल्यांकनात वाशीम जि. प. ला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे सर्वाधिक योगदान लाभले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या कार्यशैलीमुळे ग्रामीण भागातील विविध योजनांच्या विकास कामांना गती मिळाल्यामुळे वाशीम जिल्ह्याला हे   यश मिळाले आहे. 


अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या मुल्यमापनाकरीता गुगल ड्राईव्ह वर स्प्रेडशिट तयार करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील योजनांचे उद्दिष्ट व साध्य या विषयी अचूक माहिती ऑनलाइन भरण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचित करण्यात आले होते. 


त्यानुसार जिल्हा व तालुका स्तरावर ऑनलाइन भरलेल्या माहितीच्या आधारे गुणानुक्रमे (रँकिंग) तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये वाशीम जिल्हा परिषदेला १०० पैकी ७१.१३ गुण मिळाले आहेत. 


विभाग प्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांच्या विकास कामाबाबत नियमित बैठका घेणे, सोपविलेल्या कामाबाबत त्यांचा पाठपुरावा करणे, कामचुकार कर्मचाज्यांवर कारवाईचा बडगा उगारणे यासोबतच अधिकारी- कर्मचारी यांना ड्रेसकोड आणि संगणकीकृत नस्ती व पत्रव्यवहार अनिवार्य करणे इत्यादी निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील प्रशासकीय व विकास कामांना गती आली आहे. मार्च महिन्यात झालेल्या या मुल्यांकनात वाशीम जि. प. ला प्रथम क्रमांक मिळाल्याने पदाधिकरी, अधिकाऱ्यांचे काैतूक हाेत अाहे. 

 

सर्वांच्या योगदानामुळे जिल्हा अग्रस्थानावर 
दरम्यान, वाशीम जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आपल्या कार्यशैलीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी सर्व विभाग प्रमुखांचेही योगदान लाभले आहे. त्यामुळेच नेहमी मागे असणारा वाशीम जिल्हा अग्रस्थानावर आला आहे. 
-राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद, वाशीम 

बातम्या आणखी आहेत...