आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येत असताना जागावाटप सन्मानजनक हवेच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येत असले तरी हे होत असताना जागावाटपही सन्मानपूर्वक झाले पाहिजे. त्यावरच पुढील काही गोष्टी अवलंबून राहतील, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी नागपुरात व्यक्त केले. 
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जाण्यापूर्वी ते नागपुरात बोलत होते. भाजपविरोधात सारे पक्ष   एकत्र येणे हे चांगले संकेत आहेत. मात्र आघाडी सन्मानपूर्वक असली पाहिजे, असे ते म्हणाले. 


आमदार निरंजन डावखरे  यांनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या कारणांमध्ये काहीही तथ्य नाही, असा दावा करीत स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याची टीका पवार यांनी केली.  


पाकिस्तानची साखर आयात करण्याच्या निर्णयावर टीका करताना सरकारला भारतातील शेतकरी जगवायचा की पाकिस्तानाचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


तब्बल सव्वा वर्ष पुरेल एवढी साखर देशात असताना केंद्र सरकारने पाकिस्तानची साखर आयात केली आहे.   गेल्या वर्षी ऊसाचे उत्पादन चांगले झाल्याने देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन झाले आहे. ही स्थिती असताना केंद्र सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. देशातील ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडायचे आणि पाकिस्तानचे शेतकरी जगवायचे, असे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे, असा आरोपही पवार यांनी केला.  

 

ही इंधनवाढ म्हणजे जनतेला स्लो पॉयझन
इंधन दरवाढीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्याच्याऐवजी केंद्रातील नेते केविलवाणे खुलासे करत असल्याची टीकाही पवार यांनी केली. या इंधन दरवाढीवर पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी मौन पाळले आहे. ही इंधनवाढ म्हणजे जनतेला स्लो पॉयझन देण्याचा प्रकार असल्याचे अजित पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...