आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर पती निघाला समलैंगिक; क्लिनिकमधील \'स्पाय कॅमेऱ्या\'त रेकॉर्ड झाले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील एक महिला डॉक्टरने तीन दिवसांपूर्वी डॉक्टर पतीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीतील जो काही प्रकार होता तो संबंधित पोलिसांनाही काही वेळासाठी धक्का देणारा होता. १८ वर्षांपासून सोबत संसार करणारा पती समलैंगिक असल्याची धक्कादायक बाब डॉक्टर पत्नीच्या निदर्शनास आली होती. या प्रकारामुळे मोठा मानसिक धक्का बसलेल्या पत्नीने स्वत:ला सावरले व पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध विश्वासघात, मानसिक त्रास देणे तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टरला सायबर ठाण्याच्या पोलिसांनी रविवार, ८ एप्रिल रोजी अटक केली आहे.

 

डॉक्टरने १४ मे २०१७ ला दुपारच्यावेळी रुग्ण म्हणून आलेल्या एका युवकासोबत समलैंगिक संबंध केल्याचे रेकॉर्डिंगमध्ये दिसून आले. त्यानंतर पत्नीने पतीसोबत न राहण्याचा निर्धार करत ती वेगळी राहू लागली. त्यानंतर डॉक्टर दाम्पत्याने संमतीनेच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा घटस्फोट झाला नाही. आता हे दाम्पत्य एकमेकांपासून वेगळे झाले. दरम्यान, डॉक्टर पत्नीने या आशयाची तक्रार ४ एप्रिलला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्तांनी सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. तपासादरम्यान सायबर पोलिसांनी या डॉक्टरला रविवारी अटक केली.


तपास करणार 
डॉक्टरला पत्नीच्या तक्रारीवरून अटक केली आहे. डॉक्टरसोबत दिसत असलेल्या त्या युवकाचा आम्ही शोध घेत आहोत. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. 
- एपीआय कांचन पांडे, सायबर पोलिस ठाणे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा क्लिनिकच्या कॅबिनमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले असे काही....

बातम्या आणखी आहेत...