आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूने 23 वार केलेल्या जखमी पत्नीचा अखेर मृत्यू, पतीवर गुन्‍हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हबीबनगर क्रमांक दोनमध्ये राहणाऱ्या पती पत्नीमध्ये शुक्रवारी सायंकाळी वाद झालेल्या आपसी वादातून संतप्त पतीने पत्नीवर चाकूने तब्बल २३ घाव केले. यामध्ये गंभीर जखमी असलेल्या पत्नीला नागपूरला हलवण्यात आले असता नागपुरात पोहचताच शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. यास्मीन मिलोफर शे. रशीद (३५) असे मृतक महिलेचे तर शेख रशीद शेख हबीब (४२, दोघेही रा.हबीब नगर क्रमांक २, अमरावती) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे.

 

शेख रशीद हा ट्रकचालक म्हणून काम करतो. यास्मीन मिलोफर व शेख रशीद यांच्यात मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. तसेच त्यावेळीपासून शेख रशीद तीन मुलांना घेऊन वेगळा राहतो तर यास्मीन तिच्या आईकडे राहत होती. दरम्यान, ईदच्या दिवशी मुलांच्या भेटीसाठी यास्मीन पतीच्या घरी गेली होती. यास्मीन घरी आल्याची बाब रशीदला माहीत झाली होती. त्यामुळे तो संतप्त झाला होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पुन्हा यास्मीन मुलांना भेटण्यासाठी गेली तेव्हा रशीद घरी आला. घरी का आली, या कारणावरून यास्मीन व रशीद यांच्यात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात शेख रशीदने चाकू काढून यास्मीनच्या शरिरावर चाकूने तब्बल २३ वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील नागरिक व आईने तिला इर्विनमध्ये दाखल केले. दुसरीकडे शेख रशीद स्वत:च गाडगेनगर पोलिसांसमोर हजर झाला. शेख रशीदविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळीच गुन्हा दाखल झाला होता.

 

हत्येचे कलम वाढवणार
शेख रशीदने पत्नीवर वार करून तो पोलिस ठाण्यात आला. दुसरीकडे यास्मीनचा नागपुरात मृत्यू झाला. या प्रकरणात शेख रशीदविरुद्ध नागपुरातून मृत्यू संदर्भातील कागदपत्र प्राप्त होताच हत्येचे कलम वाढवण्यात येणार आहे.
- मनीष ठाकरे, ठाणेदार, गाडगेनगर.

 

बातम्या आणखी आहेत...