आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून मामेभाऊ, चुलत दिराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सुनेनेच आपल्या पोटच्या गोळ्याचा खून करून त्याचा मृतदेह घरात पुरून ठेवल्याची शंका वृद्ध आईने पोलिसांजवळ व्यक्त केली. याआधारे पाेलिसांनी शहानिशा केली असता, वृद्ध आईने व्यक्त केलेली शंका खरी ठरली. या प्रकरणी पोलिसांनी २३ दिवसांनंतर घराच्या अंगणात गाडलेल्या मृतदेहासह मृतकाची पत्नी व चुलतभावाला ताब्यत घेतले. ही घटना ही घटना तालुक्यातील कापसूतळणी येथील साईनगर परिसरात अनैतिक संबंधातून घडल्याची माहिती रहिमापूर पोलिसांनी दिली. महेंद्र ईश्वरदास इंगळे (३५) असे मृतकाचे नाव आहे. ही कारवाई रविवारी (दि. १०) रात्री उशीरा करण्यात आली. 


या प्रकरणी मृतकाची पत्नी, सोनाली महेंद्र इंगळे (३२) व मृतकाचा चुलत भाऊ सचिन हरिदास इंगळे (३१) दोघेही रा. साईनगर, कापूसतळणी यांना अटक केली. त्यांना सोमवारी (दि. ११)न्यायालयात हजर करण्यात आले. सुनील रामकृष्ण तायडे, रा. साईनगर हा या घटनेतील तिसरा आरोपी आहे. मृतक हा मोलमजुरी करीत होता.घटनेच्या दिवशी, १९ मे रोजी मृतक महेंद्र हा बाहेरून घरी आला असता सचिन व सुनील तायडे हे जेवत असून सोनाली त्यांना वाढत असल्याचे दिसले. महेंद्रने याबाबत तिघांनाही हटकले असता सचिनने जवळच पडलेला दगडी खलबत्ता महेंद्रच्या डोक्यात घातल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. 


तीन मुले झाली पोरकी 
सोनाली व सचिनच्या अनैतिक संबंधात महेंद्रचा बळी गेल्याने दोन मुली व एका मुलाचे पितृछत्र तर हरवलेच, परंतु आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नकळत्या वयातच मुलांवर पोरके होण्याची वेळ आली, तर म्हातरपणात आईचा आधार नाहीसा झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...