आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशनाचा उद्या वाजणार बिगुल; विरोधक शेतकरी आत्महत्येवरून सरकारला घेरणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सायंकाळी ‘रामगिरी’ या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. दुपारी ३ वाजता विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होईल.  


दरम्यान, विरोधकांनी सरकारला कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून घेरण्याची रणनीती आखली आहे. कर्जमाफी फसवी असून लाभार्थ्यांपर्यत कर्जमाफीचा लाभ पोहोचलाच नाही, असा आरोप आहे. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरण्याची रणनीती आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीची दिंडी तर दुसऱ्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त मोर्चा विधिमंडळावर धडकेल. 


तगडा पोलिस बंदोबस्त
अधिवेशनासाठी तगडा पोलिस बंदोबस्त आहे. बाहेरून २७३० पोलिस अधिकारी व कर्मचारी आले आहेत. सीआरपीएफच्या ०८ कंपन्या, फोर्स वनचे एक युनिट, क्यूआरटीचे ०४ युनिट, ०८ बाॅम्ब शोध व नाशक पथके, २२६ सीसीटीव्ही तैनात राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...