आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरधरी अफवेच लोण मुख्‍यमंत्र्यांच्‍या नागपुरात, 200 जणांच्‍या तावडीतून थोडक्‍यात बचावली महिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पोरधरी टोळीतील असल्याच्या अफवेतून एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रसंग नागपूर ग्रामीण पोलिसांच्या प्रसंगावधानाने टळला. पोलिसांनी वेळीच या महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका केल्याने धुळे येथील घटनेची पुनरावृत्ती टळली. नागपूर जिल्ह्यात पारशिवनी तालुक्यात करंभाड या गावात घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. गावात फिरत असलेल्या अनोळखी महिलेबाबत गावातील लोकांमध्ये संशयाचे वातावरण तयार झाले. ही महिला मुले पळवणाऱ्या टोळीतील असावी, असा संशय निर्माण झाला. त्यातून मोठा जमाव गोळा झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन महिलेची सुटका केली. 

 

 

पारशिवनी तालुक्‍यातील करंभाड गावात बुधवारी ही घटना घडली. जयश्री रामटेके असे पीडित महिलेचे नाव आहे. त्‍या करंभाड गावात जयश्री वस्‍तीतून जात असताना त्‍यांचा पेहराव पाहून बाहेर खेळत असलेली लहान मुले चोर-चोर असे ओरडली. मुलांच्‍या आवाजानंतर परिसरातील महिला-पुरूषांनी ताबडतोब रस्‍त्‍यावर धाव घेत महिलेला पकडले व तिची विचारपूस सुरू केली. सध्‍या पोरधरी टोळीची अफवा असल्‍याने जमावाने याच संशयेतून महिलेला मारहाण करण्‍यास सुरूवात केली. यावेळी जवळपास 200 जणांच्‍या तावडीत ही महिला सापडली होती.


थोडकयात बचावली महिला
या घटनेची माहिती मिळताच पीएसआय दिलीप आगरकर आणि एक महिला पोलिस कर्मचारी संगीता ताबडतोब घटनास्‍थळी पोहोचले. संगीता यांनी जमावाच्‍या तावडीतून महिलेला आपल्‍या ताब्‍यात घेतले. नंतर पीएसआय दिलीप आगरकर यांनी महिलेला आपल्‍या बाईकवर बसवून पोलिस स्‍टेशनमध्‍ये आणले. घटनास्‍थळी पोलिस वेळेत पोहोचल्‍याने ही महिला थोडक्‍यात बचावली.      

 

 

बातम्या आणखी आहेत...