आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरसुखासाठी नकार दिल्याने पुतण्यानेच केली काकूची हत्या, आराेपींनी दिली गुन्ह्याची कबुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पथ्रोट - शरीर सुखाच्या केलेल्या मागणीला काकूने नकार दिल्याने सख्ख्या पुतण्यानेच मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांनी संशयित म्हणून पकडलेल्या आरोपींनी शनिवारी (दि. ३०) दिली. ही घटना येथील वॉर्ड क्र. ५ मध्ये गुरुवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रजत नागेश डोंगरे (२०) व बंटी रमेश भोगे (३२) यांना ताब्यात घेतले होते. मृतक काकूचे नाव अरुणा जितेंद्र डोंगरे (३२, वॉर्ड क्र. ५) असे आहे.

 

मृतक अरुणाच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. तिला दोन मुले आहेत. एक मुलगा इंदूर येथे मावशीकडे राहतो, तर दुसरा मुलगा हा अरुणाजवळच राहत असे. घटनेच्या वेळी तो एका फार्म हाऊसवर झोपायला गेला होता. जाण्यापूर्वी त्याने फोनवरून चुलत भाऊ रजत याला घरी झोपायला जाण्यास तसेच मृतक अरुणासाठी डोकेदुखीच्या गोळ्या घेऊन जाण्यास सांगितले होते. दरम्यान, मित्रासह रजतने घरी येऊन काकूकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच दोघांनीही तिच्याशी झटापट केली. काकूचा विरोध पाहता रजतने खोलीतील वरवंटा उचलून तिच्या डोक्यात दोन वार केले. ती खाली कोसळताच तिचा मृत्यू झाल्याचे समजून दोघांनीही पळ काढला. पथ्रोट पोलिसांनी ठाणेदार सतीश आडे यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास पथ्रोट पोलिस करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...