आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखकांनो, स्वत:वर बंधने लादून घेऊ नका; साहित्य संघाच्या कार्यक्रमात चपळगावकरांचे अावाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘कधी लोकांना काय वाटेल म्हणून, कधी राज्यकर्त्यांना आवडेल की नाही म्हणून वा कधी विरोधी लिहिले तर पुरस्कार मिळणार नाही म्हणून, अशा अनेकविध कारणांनी लेखकच अनेकदा स्वत:वर बंधने लादून घेतात. लेखकांनी स्वत:वर अशी बंधने लादून घेऊ नयेत,’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी केले. 


विदर्भ साहित्य संघाच्या ९५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख  पाहुणे म्हणून ते बोलत होते.  ते म्हणाले,  कोणत्याही सरकारला मनोमन कोणी आपल्याविरुद्ध लिहिलेले आवडत नाही. पण त्याची भीड न बाळगता लेखकाने लिहिते व्हावे. आज सहिष्णुतेची खरी गरज आहे. नाटके बंद पाडली जातात. लेखकाला संपवण्याचे प्रयत्न हाेतात. अशा वातावरणात कोणत्या न्यायालयात जावे, हे समजत नाही. अशा बंदीविरुद्ध उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. आज उदारमतवादी लोकशाहीचे शिक्षण देणे गरजेचे अाहे.

बातम्या आणखी आहेत...