आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nagpur- साखरपुड्यानंतर भावी पत्नीने दिली धमकी, तरुणाने बदनामीच्या भीतीने गळफास घेऊन संपविले जीवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- साखरपुड्यानंतर भावी पत्नीचे एका युवकाशी असलेले प्रेससंबंध उघड झाल्याने तरुणाने लग्नास नकार दिला. मात्र तिने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शहरातील बजाजनगर परिसरात घडला असून पोलिसांनी युवती आणि तिच्या मैत्रिणीवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन उर्फ बिट्‌टू पोटदुखे (वय 28, चिखलगाव, ता. वणी- यवतमाळ)  हा आरबीआय बॅंकेत अधिकारी पदावर कार्यरत होता तर आरबीआय कॉलनीत राहत होता. त्याचे नात्यातील एका मुलीशी लग्न ठरले होते. दोघांचा 30 एप्रिलला साखरपुडा झाला. त्यानंतर 2 जुलैला लग्न ठरले होते. यादरम्यान लग्नापूर्वी दोघांच्याही भेटीगाठी झाल्या. चेतनने तिचा मोबाईल तपासला. त्यावेळी व्हॉट्‌सअॅपवर एका मित्रासोबत चॅटिंग चेतनला दिसली. त्याने आक्षेप घेतल्यानंतर तिने "सॉरी' म्हणत विषय बदलविला.

 

पण चेतनला तिच्याविषयी शंका आल्याने मोबाईलची गॅलरी तपासली असता त्यामध्ये एका मित्रासोबत व्हिडीओ आणि फोटोदिसले. याबाबात त्याने विचारणा केली असता तिने काहीही सांगण्यास नकार दिला. उलट त्यालाच गुणदोषांसह स्विकारण्याची सूचना करून रागारागात निघून गेली. यानंतर चेतनने तिच्या वडीलांशी चर्चा करून लग्न मोडले. मात्र आरोपी युवती आणि तिच्या मैत्रिणीने मोबाईलवरून चेतनला पोलिसात खोटी तक्रार करून फसवू तसेच जगणे कठीण करून टाकू, अशी धमकी दिली. या धमकीला कंटाळून चेतनने बुधवारी सकाळी अकरा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. 

बातम्या आणखी आहेत...