आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर एक्स्प्रेस हायवेवरील विहिरीत युवतीचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बडनेराला जाणाऱ्या सुपर एक्स्प्रेस हायवेलगतच्या एका विहिरीत शुक्रवारी दुपारी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपर्यंत मृतक युवतीची ओळख पटली नव्हती. 


रहाटगाव रिंग रोडपासून बडनेराच्या दिशेने अवघ्या दीड किमी. अंतरावर अजमिरे यांचे पडीक शेत आहे. याच शेतात एक विहीर असून, या विहिरीजवळ नेहमीच दारुडे बसतात. तसेच काही आक्षेपार्ह वस्तूसुद्धा विहिरीजवळ मिळून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. याच विहिरीत शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका युवतीचा मृतदेह असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले.

 

पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने युवतीचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह पाण्यामुळे काहीसा फुगला होता. त्यामुळे युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सदर युवतीचे वय ३० च्या आसपास असून तिच्या अंगावर काळ्या व केशरी रंगाचे कपडे आहेत. पायात बूट आहे. तसेच या मृतदेहापासून काही अंतरावर विहिरीतच एक चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. त्यामध्ये 'मी आईच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत' असल्याचे नमूद केले आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...