आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी घेताना दरीत पाय घसरून युवकाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखलदरा - मित्रांसोबत चिखलदरा येथे फिरायला आलेल्या युवकाचा सेल्फी घेण्याचा प्रयत्नात पाय घरून दरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. राहुल श्यामराव पाखरे (२५) रा. चिचोना, निमखेड बाजार, अंजनगाव सुर्जी असे मृतक युवकाचे नाव आहे.

 

घटनेच्या वेळी मृतक हा आपल्या सहा मित्रांसाेबत चिखलदरा येथे फिरण्यासाठी आला होता. दरम्यान भिमकुंड पॉइंट येथे सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा अचानक पाय घसरून तोल गेल्याने दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित युवकाचा शोध घेतला. पोलिसांना राहुलचा मृतदेह मिळाला. त्यांनी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून. घटनेचा पुढील तपास चिखलदरा पोलिस करत आहेत. घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाइकाला देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...