आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणीस शेतात गेलेल्या तरुणाचा वीज पडून मृत्यू ; २ महिला जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अडगाव शिवारात पेरणीसाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या दोन महिला भाजल्या गेल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. 


गौतम गजाननराव नन्नावरे (३०, रा. अडगाव) असे मृतक युवकाचे नाव आहे. याचवेळी वंदनाताई जगतराव गणवीर (५२) आणि तुळजाबाई शंकरराव बन्सोड (६१, दोघीही रा. अडगाव) असे जखमींची नावे आहेत. गौतम नन्नावरे, वंदना गणवीर, तुळजा बन्सोड व अन्य काही व्यक्ती गावातीलच दयासागर अर्जुन कुभंलवार यांच्या शेतात बुधवारी पेरणीसाठी गेले होते. पेरणी अंतिम टप्प्यात असतानाच सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजताच्या सुमारास अडगाव शिवारात जोरदार पाऊस आला. पाऊस आल्यामुळे काम करणारे सर्व मजूर शेतातच असलेल्या झाडांच्या खाली उभे राहण्यासाठी गेले. यावेळी गौतम व या दोन महिला एका कडूनिंबाच्या झाडाखाली उभ्या होत्या. त्याच झाडावर वीज कोसळली. वीज कोसळल्यामुळे तिघेही जखमी झाले. त्यानंतर त्यांना तिघांनाही तातडीने उपचारासाठी शहरातील इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी गौतम यांना मृत घोषित केले. याचवेळी दोन जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती लोणी पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनीही गावात भेट दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...