आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्‍ये तरूणाचा निर्घूण खून, अनैतिक संबंधातून हत्‍या झाल्‍याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- शहराच्या वाघापूर परिसरातील बोदड शिवारात असलेल्या चिंतामणी नगरमध्ये एका ३५ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली.  ही घटना आज दि. 25 रोजी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास घडली. अनिल भीमराव गजभिये असे मृत तरुणाचे नाव असून तो चिंतामणी नगर येथील रहिवासी आहे. तो डीजे आणि मंडप डेकोरेशनचे काम करीत होता.

 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस आधिकारी पियुष जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, लोहारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शीतल मालटेसह इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मृतदेहाची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला, त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करीत जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. खुनामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र अनिल गजभिये याचा खून अनैतिक संबंधमधून  झाला असावा असा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...