आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतवाड्यात पुलाच्या पाइपमध्ये अडकलेल्या युवकाचे वाचवले प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा - अचलपूर नगर परिषद अंतर्गत परतवाडा शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बिच्छन नदीवरील कोर्ट रोड ते एलआयसी चौक येथील पुलाचे बांधकाम नगरपालिके अंतर्गत नियुक्त एजन्सीच्या वतीने सुरू करण्यात आले असून, त्याकरिता काढण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याच्या पुलाखालील वापरण्यात आलेल्या लोखंडी पाइपमध्ये एक युवक जाऊन अडकला. तो मृत्युशी झुंज देत असताना मंगळवारी सकाळी नगर परिषद अग्निशमन विभाग व सर्पमित्र भोपाली यांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

 

अचलपूर नगर परिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या नवीन पुलाच्या बाधकामासाठी १ कोटी ७ लाख रुपयांच्या कामाला सुरुवात केली आहे. याकरिता नियुक्त एजन्सीने या मार्गावरून नागरिकांना येणे जाणे सोयीचे व्हावे, म्हणून तात्पुरता रस्ता व पूल तयार केला आहे. सोमवारी रात्रीपासून कांडली येथील रोशन मेहरे हा युवक या पाइपलाइनमध्ये अडकला होता. मंगळवारी या पुलावरून जात असताना संजय तिवारी यांना या युवकाच्या हालचाली व आवाज ऐकू आल्याने त्यांनी त्वरित रुपेश लहाने यांना याबाबत माहिती दिली. लहाने यांनी त्वरित अग्निशमन विभाग व भेापाली यांच्याशी संपर्क करून या युवकाला काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्याला काढणे कठीण होते. पाइपलाइनमधून नालीचे दुर्गंधीयुक्त पाणी व पाइपलाइनचा व्यास कमी असल्याने तो पूर्णत अटकलेल्या अवस्थेत होता.

 

बातम्या आणखी आहेत...