आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या ऑटोला रोहीची धडक; तीन चिमुकले जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मार्डी मार्गावर असलेल्या शाळेत जाण्यासाठी प्रवासी ऑटोने निघालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या ऑटोला रोहीने धडक दिली. या धडकेत ऑटो उलटला व ऑटोतील चारपैकी तीन चिमुकले जखमी झाले. हा अपघात मार्डी मार्गावरील राजुरा नाक्यावर सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झाला.

 

श्लोक राजेश रोडगे (७, रा. वडाळी), अलंकिता राजेश वडाणे (८, रा. व्यंकटेश कॉलनी) आणि आयुष हनुमान करपाते (११, रा. वडाळी) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. ऑटो चालक प्रफुल्ल विष्णुपंत डोईफोडे (३५, रा. चपराशीपुरा, अमरावती) हे सुद्धा जखमी झाले. जखमी झालेले तिन्ही विद्यार्थी मार्डी मार्गावरील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहेत. सोमवारी सकाळी शाळेला जात असताना ऑटो राजूरा नाक्यापर्यंत पोहोचला असता रोहींचा एक कळप मार्ग ओलांडत होता. त्याचवेळी एक रोही थेट ऑटोवर येऊन धडकला. या धडकेत रोहीचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर ऑटो उलटला. त्यामुळे ऑटोतील चिमुकले जखमी झाले. अपघात झाल्यानंतर रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मुलांना बाहेर काढून इर्विनला आणले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर फ्रेजरपुराचे पीएसआय राजू लेवटकर पथकासह घटनास्थळी पोहोचले होते.


पुन्हा विद्यार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
२७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस अमरावतीकरांसाठी विस्मरणात जाणारा नाही. याच दिवशी सकाळी घरातून शाळेसाठी बाहेर पडलेले सहा चिमुकले स्कुलव्हॅनच्या अपघातात एकाच वेळी मृत्यूमुखी पडले होते. या अपघाताने संपूर्ण राज्यातील विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता.

 

बातम्या आणखी आहेत...