आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या पाेषणासाठी महिला कर्मचाऱ्यांना ६ महिने रजा; पत्नी हयात नसल्यास पुरुषांनाही मिळेल लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना अापल्या मुलांच्या पालनपोषणासाठीही १८० दिवस (सहा महिने) विशेष रजा देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात अाला. अापली मुले अठरा वर्षांची हाेईपर्यंत या महिलांना टप्प्याटप्प्याने ही रजा घेता येईल. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. पत्नी हयात नसल्यास पुरुष कर्मचाऱ्यांनाही रजा मिळेल. 


मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत
राज्यात २००५ पासून अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू अाहे. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवृत्तिवेतनापोटी अत्यल्प रक्कम मिळते. अशा कुटुंबीयांना अाता एकरकमी दहा लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...