आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची उभ्या टिप्परला धडक; पाच विद्यार्थी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भरधाव टाटा सफारी गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परवर आदळून झालेल्या अपघातात ५ विद्यार्थी जागीच ठार, तर ४ जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील चुरमुरा गावाजवळ घडली. दरम्यान, मृत गडचिरोली कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून परीक्षा संपल्याने ते पार्टी करण्यासाठी बाहेर गेले होते.

  
प्रशांत सुधाकर रणदिवे (२४, रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर), अंकित वेलादी (२२, रा. डुम्मे, ता. एटापल्ली), निहाल प्रदिते (२१, रा. आमगाव, जि. गोंदिया), प्रणय रमेश सिडाम (२०, रा.आष्टी, ता. चामोर्शी) आणि वैभव पावे (१८, रा. पेंढरी, ता. धानोरा) अशी मृतांची नावे आहेत. 
महाविद्यालयाची परीक्षा संपल्याने ९ विद्यार्थी रात्री उशिरा पार्टी करून गडचिरोलीकडे टाटा सफारी कारने परत येत होते. वाहन चालवणाऱ्या विद्यार्थ्याचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परवर आदळली.  यात समोरच्या भागाचा भाग चेंदामेंदा झाला व टिप्पर किमान ८ ते १० फूट पुढे जाऊन थांबला. टाटा सफारीतील पाच विद्यार्थी घटनास्थळीच ठार झाले, तर चौघे गंभीर जखमी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...