आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ४ जुलैच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार अाहे, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केला. येथे बैठकीसाठी आलेल्या मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता त्यांनी जुलैच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले. 


शिवसेनेशी युतीचे प्रयत्न सुरुच आहेत. त्यात यश येईल असा विश्वास व्यक्त करून मुनगंटीवार म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने जदयूचे कुमारस्वामींशी युती केली. या दोन पक्षांत पटत नव्हते. भाजप, शिवसेना हे जुने मित्र पक्ष आहेत. त्यामुळे युती करण्यात गैर नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस ,राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी आसुसलेले आहेत. त्यामुळे त्यांची आघाडीही सत्ता मिळवण्यासाठीच झाली आहे, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...