आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यवतमाळ- बाभुळगाव तालुक्यातील सावर या गावी राहणाऱ्या युवकाचा तो राहत असलेल्या घरातच कुऱ्हाडीचा घाव घालुन निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजन घटना बुधवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.विजय उर्फ मुन्ना स्वरुपसिंग चव्हाण (ठाकूर) वय ३४ वर्षे रा. सावर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मुन्ना हा त्याच्या घराशेजारी घर असलेल्या संतोष ठाकुर याच्या घरात रात्री झोपत होता. संतोष हा बाहेरगावी राहत असल्याने मुन्ना तेथे नेहमी झोपायचा. दरम्यान बुधवारी सकाळी ९.३० वाजुनही मुन्ना बऱ्याच वेळापर्यंत बाहेर न आल्याने त्याचा नोकर त्याला उठविण्यासाठी गेला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुन्नाचा मृतदेह त्याला दिसला. योळी त्याने केलेला आरडा-ओरडा ऐकुन शेजारच्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. अवघ्या काही वेळात या घटनेची वार्ता संपुर्ण तालुक्यात पोहचली. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी गोळा झाली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पियुश जगताप, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार करीम बेग मिर्झा, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोद पाचकवडे, जमादार राजकुमार आडे, महेश पुनसे, लीलाधर वानखडे घटनास्थळी दाखल झाले. घ्टनास्थळाचा पंचनामा करुन त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाणा केला.
मुन्ना ज्या घरात राहत होता त्या ठिकाणी त्याच गावात राहणारा मात्र सध्या यवतमाळ येथील तारपुरा परिसरात स्थानिक असलेला त्याचा मीत्र गुलाब इंगळे हा गेल्या काही दिवसांपासुन त्याच्यासोबत राहत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र घटनेपासुन तो बेपत्ता आहे. त्यामुळे त्याने मुन्नाचा खुन केला असावा असा संशय पोलिसांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. मुन्ना याच्याविरुद्ध काही गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी आहे. शीवाय गेल्या काही महिन्यांपुर्वी त्याला पीस्तुलासह पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुन्नाकडुन कुठला गुन्हा घडला नसल्याचे सांगण्यात आले आहे. गुलाब इंगळे याच्याकडे मुन्नाचे काही पैसे उधार होते असेही सांगण्यात आल्याने आता पोलिस गुलाब इंगळे याचा शोध घेत आहेत.
गावातच बनवली होती ती कुऱ्हाड
मुन्ना याचा खुन करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड गुलाब इंगळे यानेच काही दिवसांपुर्वी सावर या गावातच तयार करुन घेतली होती. त्याच कुऱ्हाडीचा वार मुन्नाच्या डोक्यात करुन मारेकऱ्याकडुन त्याचा खुन करण्यात आला आहे. हा वार इतका जोरदार होता की कुऱ्हाड मुन्नाच्या डोक्यात पुर्ण घुसली होती. या संदर्भात माहिती मिळाल्याने पोलिसांचा गुलाब इंगळे याच्याविरुद्ध संशय बळावला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.