आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • CRIME: मद्यपी दिराची भावजयीवर वाईट नजर, संतप्‍त मोठ्या भावाने केली धाकट्याची निर्घृण हत्‍या, Elder Brother Killed Drunker Younger Brother For Troubling Family

CRIME: मद्यपी दीराची भावजयीवर वाईट नजर, थोरल्याने केली धाकट्याची निर्घृण हत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पत्‍नीवर वाईट नजर ठेवणा-या व दारूच्‍या नशेत आईला मारहाण करणा-या धाकट्या भावाची थोरल्‍याने निर्घृण हत्‍या केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार नागपूरात घडला आहे. हत्‍या केल्‍यानंतर मोठा भाऊ स्‍वत: पोलिस स्‍टेशनमध्‍ये हजर झाला व याबाबत पोलिसांना माहिती दिली.  


धाकट्या भावाच्‍या दारूच्‍या व्‍यसनामुळे कुंटुबिय होते त्रस्‍त
नागपुरातील जागनाथ परिसरात बुधवारी ही घटना घडली. धाकटा भाऊ संजय आमदे हा अनेक वर्षांपासून दारूच्‍या आहारी गेला होता. तसेच तो कोणता कामधंदाही करत नसे. दारूच्‍या नशेत तो नेहमी आईला मारहाण करायचा. तसेच मोठा भाऊ राजू आमदे यांच्‍या पत्‍नीवरही वाईट नजर ठेवायचा. यामुळे अखेर चिडून बुधवारी राहत्‍या घरातच राजू यांनी संजयची हत्‍या केली. हत्‍या केल्‍यानंतर स्‍वत: पोलिस स्‍टेशनमध्‍ये जाऊन त्‍यांनी याविषयी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी राजूला अटक केली. भावाच्‍या वर्तवणुकीला कंटाळूनच राजू आमदे यांनी हत्‍या केल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...