आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोषागार लिपिकाचा २९ लाखांचा अपहार, नवापुरातील प्रकार; खोटे देयकांनी वळवले पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- शहरातील उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) याने ११ जून रोजी उपकोषागार कार्यालयातील संगणक प्रणालीत तहसीलदारांच्या नावाने खोटे देयक तयार केले. या देयकात खाडाखोड करत स्वतःचे नाव टाकून बॅंकेच्या सूचना पत्रकावर उप कोषागार अधिकाऱ्यांची बनावट सही केली. तसेच हे सूचना पत्रक स्टेट बँकेत सादर करून २९ लाख रूपये स्व:तच्या खात्यात जमा करून घेतले. या प्रकरणी जाधव याला अटक झाली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


येथील उपकोषागार कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून इंदेलसिंग महारू जाधव कार्यरत आहेत. त्यांनी खोटे देयक तयार करून २९ लाख रूपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. त्याने ११ जून रोजी एटीएम सेंटरमधून ४० हजार रूपये काढले. त्यानंतर १२ जून रोजी बॅंकेतून २५ लाख रूपये काढले. तसेच त्याच दिवशी एटीएम सेंटरमधून ४० हजार रूपये काढून घेतले. उर्वरित रक्कम त्याच्या खात्यावर जमा आहे. दोन दिवसानंतर बॅंकेच्या अहवाल आल्यावर उपकोषागार अधिकारी संजय गोविंद साळी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्याच्याकडून २२ लाख १४ हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बांधकर यांनी नवापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...