आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हावडा- मुंबई मेलच्या इंजिनला लागलेली आग विझवताना ड्रायव्हरचा मृत्यू, प्रसंगावधानाने वाचला प्रवाशांचा जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा/ अमरावती- हावडा - मुंबई मेलच्या इंजिनला पुलगाव रेल्वे स्थानकावरयेथे सायंकाळी 4.45 वाजता आग लागली. आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान साधत इंजिन बंद केले. तर आगीपासून वाचण्यासाठी उडी टाकलेल्या सहचालकाचा मात्र मृत्यू झाला. दुसरे इंजिन येईपर्यंत मेल तेथेच उभी करण्यात आली आहे. प्रवाशी सुखरूप आहे. या मार्गावरील वाहतूक 3 तासांपासून खोळंबली आहे. ही आग 45 सेल्सियस तापमानामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

इंजिनला आग लागल्याचे पुलगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे चालकाच्या लक्षात येताच गाडी थांबविण्यात आली आगीने भडका घेतला असता, आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेतील इंजिन मधील २ फायर यंत्रानी आग विझविण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे वर्धा येथून दुर्घटना रेल्वे पाठवण्यात आली. या रेल्वे मध्ये रेल्वे चालक नायर व एस के शर्मा त्या इंजिन मध्ये होते त्या दोघांनी आज विझविण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आग आटोक्यात येत नव्हती. आगीने जास्त प्रमाणात भडका घेतल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेतील सहायक चालक एस के शर्मा यांनी उडी घेतली असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तर इंजिन चालक धमलाल ब्राम्हणे यांच्या हिंमतीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला, त्यांनी इमरजंसी ब्रेक मारून ताबडतोब इंजिनचे विद्युत कनेक्शन कट केले, मात्र आगीच्या झळामुळे ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.  हावडा एक्स्प्रेसला आग लागल्यामुळे हावडा कुर्ला एक्स्प्रेस तळणी रेल्वे स्थानकावर तर हावडा पूणे आझाद हिंद एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. मालगाडीसह इतर रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत. नागपूरला व अमरावतीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे चित्र वर्धा बसस्थानकावर होते.

बातम्या आणखी आहेत...