आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • वाहनकर्ज: बनावट कागदपत्रांद्वारे नागपुरात तीन बँकांची 104 कोटींनी फसवणूक Bank Fraud Vehicle Loan For Duplicate Documents In Nagpur

वाहनकर्ज: बनावट कागदपत्रांद्वारे नागपुरात तीन बँकांची 104 कोटींनी फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बँकांच्या फसवणुकीत उपराजधानी नागपूरही मागे नाही. सध्या देशभरात बँक घोटाळे आणि फसवणुकीची प्रकरणे गाजत आहेत. पुरेसे तारण नसतानाही बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना पदाचा गैरवापर करून कर्ज मंजूर केल्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्यासह इतरांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. आयसीआयसीआयच्या बँकेच्या संचालक चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. यातच बनावट कागदपत्रे सादर करून नागपुरातील तीन बँकांना तब्बल 104 कोटींनी गंडा घालण्यात आल्याची प्रकरणे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये इंडियन ओव्हरसिज बँकेला 1 कोटी 73 लाख, देना बँकेला 100 कोटी आणि युको बँकेची 2 कोटी 27 लाख 42 हजार रूपयांनी फसवणूक करण्यात आली आहे.

 

युकोची सव्वा दोन कोटींनी फसवणूक
युको बँकेच्या प्रकरणात आरोपी लोन एजंट मुकेश जाधव व धनंजय सुरकर यांनी गुन्ह्यात सहभागी 25 कर्जदार व 25 सहकर्जदार यांच्याशी संगनमत करून कार खरेदी करण्याकरीता बनावट कागदपत्रे सादर करून युको बँकेतून कर्ज मिळवले. कर्ज रकमेची पे ऑर्डर कार डिलरच्या नावाने निरनिराळ्या बँकेत उघडलेल्या एकूण 7 बनावट खात्यांमध्ये वटवली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही वाहन खरेदी न करता रक्कम स्वत:च्या वैयक्तिक कामांसाठी वापरली. युको बँकेचे झोनल मॅनेजर वेंकटनारायण रामनाथम गरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे तपास करीत आहेत.

 

इतर 25 कर्जदार व सहकर्जदारांमध्ये संजय नेते व प्रतिमा नेने, शफि सलाउद्दीन शेख व शबनम शेख, सतीश वितोंडे व रेखा वितोंडे, चेतन बमनोटे व सुजाता बमनोटे, परीक्षित मेश्राम व सुजाता मेश्राम, अजय दुबे व सचिन दुबे, प्रदीप भिवापूरकर व सरीता भिवापूरकर आदींचा समावेश आहे.
या प्रकरणात 25 कर्जदार व सहकर्जदारांनी युको बँकेत कर्ज मिळावे यासाठी 2012 मध्ये अर्ज केले होते. त्या नंतर युको बँकेच्या रिटेल लोन हबमधील तत्कालीन क्लर्क विनोद तुमडे याने कर्जदार व सहकर्जदारांचे लोन प्रपोजल तयार करून विक्री विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोश शेंडे यांच्याकडे सादर केले. त्या नंतर तुमडे व शेंडे यांनी कोणतीही पडताळणी न करताच कर्ज मंजूर करण्याविषयी सकारात्मक अहवाल सादर केला. त्यामुळे युको बँकेच्या माऊंट रोड शाखेतून 22 व स्वावलंबी नगर शाखेतून 3 प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्या नंतर कर्जदार परतफेड करीत नसल्याचे व खरेदीची कागदपत्रे सादर न केल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्या नंतर बँकेने चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

 

या प्रकरणातील एकूण 62 आरोपींपैकी 48 आरोपींना अटक करण्यात आली आहे. काहींना न्यायालयाने कर्ज रक्कम भरण्यासह इतर अटींवर जामीन मंजूर केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यत 10 कर्जदारांनी कर्जाची रक्कम बँकेत भरून खाते बंद केले आहे. आतापर्यत एकूण 1,57,13,650 रूपये वसूली झाली आहे. यातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

 

1 कोटी 73 लाखांनी फसवणूक
16 कर्जदार आरोपींनी एकमेकांचे गॅरण्टर राहून इंडियन ओव्हरसिज बँकेच्या हनुमान नगर व उंटखाना शाखांची एकूण 1 कोटी 73 लाखांनी फसवणूक केली. आरोपींनी प्रत्यक्षात दुचाकी खरेदी केल्या. मात्र कार डिलर कंपनीचे कोटेशन, इनव्हाईस, उत्पन्नाचा दाखला, सॅलरी स्लिप, आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र यासह विविध बँकांचे बनावट स्टेटमेंट अशी सर्व बनावट कागदपत्रे सादर केली. या आधारे कार खरेदी केल्याचे दाखवून बँकेची कोट्यवधीने फसवणूक करून रक्कम हडप केली.

 

या प्रकरणी इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून मो. जावेद शेख मो. अब्दुल शेख, भूषण नंदकिशोर चरडे, राजेश (राज) शामलाल आडे, विवेक शरद दिवाण, अनिस खान महबूब खान पठाण, मुजीब वाहीद खान, शाहीद अहमद खान जमिल अहमद खान, स्वप्निल विष्णू भूजाडे, रमेश रवींद्र पिल्लई उर्फ राजेश प्रभाकरन नायर, मोहंमद अब्दुल जुबेर मोहंमद अब्दुर रशिद, गोपाल रामप्रसाद अग्रवाल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इंडियन ओव्हरसिज बँकेचे तत्कालिन वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश गणपतराव भंडारकर, सहायक व्यवस्थापक गोपीचंद पिलाजी खांडेकर व प्रणाली चरणदास बागले यांनी कर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करताच कर्ज व मार्जीन रकमेचे डीडी आरोपींना देऊन टाकले. या गुन्ह्यात आतापर्यत 23,10,000 इतकी रक्कम रिकव्हर झाली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल काळे तपास करीत आहेत.

 

देना बँकेची 100 कोटींनी फसवणूक
देना बँकेच्या विविध शाखांची तीन वर्षात 19 प्रकरणांमध्ये 100 कोटींनी फसवणूक करण्यात आली आहे. दोन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 प्रकरणांचा तपास सुरू आहे. सिव्हिल लाईन्स येथील देना बँकेचे व्यवस्थापक निर्मलचंद्र यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रॉपर्टी डिलर सतीश बाबाराव वाघ, प्रभाकर दौलतराव आमदरे, अशोक रामभाऊ शिंदेकर, ललित रामचंद्र देशमुख, कुसुम मधुकर मानकर, भारत बाबूराव राजे, गणेश बाबूराव राजे, जयंत नानाजी देशमुख, जगदीश झनकलाल चौधरी, स्वप्निल भीमराव करौती व भोजराज दिनबाजी उकीनकर यांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...