आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेर्‍यात कैद झाली शिवसेना आमदाराची \'दंबगगिरी\'; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/मुंबई- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची दबंगगिरी कॅमेर्‍यात कैद झाली आहे. आमदार धानोरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार महाशय वीज कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावताना आणि कार्यकर्ते दांडुक्याने बेदम मारहाण करताना ‍दिसत आहेत.

 

काय आहे हे प्रकरण?

- चंद्रपूर जिल्ह्यात विजेचे पोल उभारण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. छत्तीसगड आणि तेलंगाणातून येणार्‍या विद्युत वाहिनीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतजमिनीवर टॉवर उभारले जात आहेत. त्यामुळे हजारों एकर जमिनीवरील पिके उद्‍धवस्त होत आहेत.
- स्थानिक शेतकर्‍यांचा टॉवर उभारण्याच्या कामाला विरोध आहे. विरोध केला जात असतानाही शेतजमिनीवर टॉवर उभारण्याचे काम सुरुच आहे. याप्रकरणी स्थानिक शेतकर्‍यांनी शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर वीज कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आली.

 

वीज कर्मचार्‍यांना लाथाबुक्कांनी मारहाण..
- आमदार सुरेश धानोरकर सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांसह राजुरा तालुक्यातील भुरकुंडामध्ये पोहोचले. पोल उभारणार्‍या वीज कर्मचार्‍यांना हटकले. इतकेच नाही तर त्यांचा चारही बाजुंनी घेरले. आमदार धानोरकर आणि कार्यकर्त्यांनी वीज कर्मचार्‍यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
- ‍आमदार धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना रोकण्याऐवजी स्वत:ही कर्मचार्‍यांचे कान शेकत हात धुवून घेतले. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून शिवसेना आमदाराविरोधात तीव्र शब्दात प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.... शिवसेना आमदाराच्या मारहाणीचे फोटोज आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...