आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या विचित्र फतव्याची समितीद्वारे होणार चौकशी; शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पुणे येथील मायर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थिनींना अमूकच अंतर्वस्त्रे घालण्याबाबत लागू केलेला विचित्र नियम आणि शाळेविषयी आलेल्या इतर तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. 


या शिक्षण संस्थेने विद्यार्थिनींनी पांढऱ्या व स्कीन कलरची अंतर्वस्त्रेच घालावीत, असा विचित्र नियम लागू केल्याचे उघड झाल्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. याशिवाय शाळेने अन्यही काही वादग्रस्त नियम लागू केले आहेत. याबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी तक्रारी केल्या असून या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान भवन परिसरात दिली. या तक्रारींवर चौकशी समिती नेमण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती देताना तावडे यांनी दिली. चौकशी समितीचा अहवाल शिक्षण विभागाकडे आल्यावर याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...